"सफर भारतीय रेल्वेची"- 17057 Mumbai CSMT - Secunderabad Devagiri Express.
१७०५७/५८ देवगिरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी "देवगिरी एक्सप्रेस" मुंबई ते तेलंगणा राज्याच्या सिकंदराबाद शहरांदरम्यान दररोज धावते.
.
....
more...
सुरुवातीच्या काळात मुंबई ते औरंगाबाद ह्या दोन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहारादरम्यान ही गाडी धावत असे. औरंगाबाद शहराजवळच्या दौलताबाद येथील "देवगिरी" ह्या किल्ल्याच्या नावावरून सदर गाडीचे नामकरण "देवगिरी एक्सप्रेस" असे करण्यात आले. तत्कालीन सुलतान मुहम्मद बिन तुघलक ह्याच्या राजवटीदरम्यान "देवगिरी" ही भारताची राजधानी म्हणून ओळखली जात असे.
.
काही काळानंतर ह्या गाडीचा मार्ग पुढे नांदेड आणि नंतर निजामाबाद पर्यंत वाढविण्यात आला आणि आता ही गाडी सिकंदराबाद पर्यंत चालवली जाते
.
मुंबईहून सुटण्याची वेळ - रात्रौ ०९:३० मि.
सिकंदराबाद येथे पोहचण्याची वेळ - दुपारी ०२:४० मि. (दुसऱ्या दिवशी)
.
.
गाडीचा विभाग - दक्षिण मध्य रेल्वे
रेक - आय सी एफ (ICF)
भोजनयान - नाही.
.
प्रवास वेळ - १७ तास १० मिनिटे
एकूण अंतर - ८७८ किमी
एकूण थांबे - २६
सरासरी वेग - ५१ किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सिकंदराबाद मार्गे कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद