#goa_news - Konkan Railway Double Decker Exp
Think so we are going to miss KR Jan Shatabdi.....
Plz someone post this news click here
.
कोकणची गारेऽऽऽऽगाऽऽर सफर लवकरच
-...
more... कोकण रेल्वे मार्गावर ‘डबलडेकर एसी एक्स्प्रेस’ सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर ‘डबलडेकर एसी एक्स्प्रेस’ सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मात्र, कोणत्या वेळेत सोडावी, याबाबत विचार सुरू असून, ‘जनशताब्दी’ऐवजी ही ‘डबलडेकर एसी’ सोडण्याचा पर्याय मांडण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींसह चाचणीसाठी डबलडेकर डबे मिळण्यातील अडसरही दूर झाल्याने आता लवकरच ‘ठंडा.. ठंडा कूल.. कूल’ प्रवासाची अनुभूती देणारी डबलडेकर कोकणवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.
डबलडेकर एसी एक्स्प्रेसमुळे एकाच वेळी दुप्पट प्रवासी प्रवास करू शकत असल्याने या पर्यायास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु ‘जनशताब्दी’ ही लोकप्रिय गाडी असल्याने तिचा बळी द्यायचा का, असा प्रश्न मध्य रेल्वेच्या अधिका-यांसमोर निर्माण झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावर डबलडेकर एसी एक्स्प्रेस सोडण्याची भूमिका घेण्यात आली होती. त्यासाठी सुरुवातीच्या काळात त्या दृष्टीने चाचपणीही करण्यात आली होती.
मुंबई-मडगावपर्यंत धावणा-या या डबलडेकर एसी एक्स्प्रेसचे दहा डबे सध्या चाचणीसाठी मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. पारसिकच्या बोगद्याच्या उंचीमुळे डबलडेकरपुढे निर्माण झालेली तांत्रिक अडचणही दूर करण्यात आली आहे. अशा स्थितीत या एक्स्प्रेसची चाचणी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांप्रमाणेच रेल्वेच्या ‘रिसर्च डिझाइन अॅन्ड स्टँडर्स ऑर्गनायझेशन’मधील ज्येष्ठ अधिका-यांचे पथकही दाखल झाले आहे. या संयुक्त पथकाकडून काही दिवस चाचण्या घेण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर डबलडेकर एसी एक्स्प्रेसची चाचण्या घेत असताना ती नेमक्या कोणत्या वेळी सोडावी, असा सध्या प्रश्न मध्य रेल्वेला पडला आहे. कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्याने या एक्स्प्रेसला मार्ग मिळणार कुठून असा प्रश्न आहे. सद्य:स्थितीत ‘जनशताब्दी’ऐवजी ही एक्स्प्रेस सोडण्याची भूमिका घेण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस आठ तासांत मुंबई आणि मडगाव गाठते. उर्वरित वेळेत गाडीच्या देखभालीपासून अनेक गोष्टींचा समावेश होतो. अशा वेळी डबलडेकर एक्स्प्रेससाठी वेगळा मार्ग मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातूनच पहाटेच्या वेळेत सुटणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या ऐवजी डबलडेकर एसी एक्स्प्रेस सोडण्याचा विचार मध्य रेल्वेच्या अधिका-यांकडून केला जात आहे. यातून प्रवाशांकडून कोणती प्रतिक्रिया उमटते, याकडेही अधिका-यांचे लक्ष लागून राहिले आहे.